Posts

Showing posts from November, 2017
बाळ नारद: ब्रह्मा, चल रे बाबा परत. जरा बदल हवा, पाणी तुंबू नये म्हणून देवघर सोडले. गेले आठ दहा महिने बरीच भटकंती झाली. आपल्या अखत्यारीत नसलेले, वेगळेच देव मानणारे, आपली पूजा न करणारे, संस्कृत तर सोड, पण मराठी हिंदी सोडून वेगवेगळ्याच भाषा बोलणारे, काही आपल्या कन्हैय्यापेक्षाही कृष्णतर तर काही आपल्या राधेपेक्षाही अधिक गौरवर्णी, तरीही अगदी आपल्या मनुपुत्रांसारखीच घडण असलेले, तसेच नाकी डोळी नीटस, थोडाफार मेकअप केला तर अगदी मानव वाटतील असे इतर जीवही पाहिले. त्यांचेही देव पाहिले. त्यांचीही आपल्या मंदिरांचाच दर्जा असणारी पूजास्थाने पाहिलीत. त्यांच्या प्रार्थनेतला एक शब्द कधी कळेल तर शपथ, पण ते कोणाचा तरी धावाच करीत आहेत यात शंका नसावी असे त्यांच्याच भिन्न भिन्न भाषातले मंत्रोच्चार ऐकले. आपल्या नागपूर नगरीकडे जेवताना जसे हात जोडून वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे । सहज हवन होते नाम घेता फुकाचे । जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।। किंवा जनीं भोजनी नाम वाचे वदावे । अती आदरे गद्यघोषे म्हणावे । हरीचिंतने अन्न सेवीत जावे । तरी श्रीहरी...